शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत

By admin | Updated: April 7, 2017 02:20 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे, तर विरोधकांकडून शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल केले

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे, तर विरोधकांकडून शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने शिवाजी गांगुर्डे यांची सभापतिपदी निवड निश्चित आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. भाजपाकडून प्रामुख्याने कॉँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले व पाच वेळा महापालिकेत निवडून आलेले शिवाजी गांगुर्डे, मनसेतून भाजपात दाखल झालेले व तीन वेळा निवडून आलेले शशिकांत जाधव आणि दोन वेळा निवडून आलेल्या अलका अहिरे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. सकाळी पक्षश्रेष्ठींकडून शिवाजी गांगुर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गांगुर्डे यांनी सभापतिपदासाठी एकूण चार अर्ज दाखल केले. त्यावर सूचक म्हणून महापौर रंजना भानसी, उद्धव निमसे, अलका अहिरे व जगदीश पाटील, तर अनुमोदक म्हणून उपमहापौर प्रथमेश गिते, संभाजी मोरुस्कर, हिमगौरी अहेर व रुची कुंभारकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. गांगुर्डे यांनी नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्धव निमसे आदि उपस्थित होते. त्यानंतर, विरोधकांमार्फत शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी सभापतिपदासाठी २ अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भागवत आरोटे व संतोष गायकवाड, तर अनुमोदक म्हणून मनसेचे गटनेते सलीम शेख व सेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. स्थायी समितीवर भाजपा-९, शिवसेना-४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. स्थायीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने शिवाजी गांगुर्डे यांची निवड निश्चित आहे. शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)