शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या

By admin | Updated: June 19, 2017 22:58 IST

पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारा सराईत गुन्हेगार संभाजी विलास कवळे (२३) याने महिनाभरापूर्वी तालुका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला होता.

नाशिक : निफाडजवळील लाखलगाव येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारा सराईत गुन्हेगार संभाजी विलास कवळे (२३) याने महिनाभरापूर्वी तालुका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. शहर गुन्हे शाखेने अटक केली होती; मात्र तालुका पोलीस ठाण्यातील मातोरी गावातील घरफोडीमध्येही कवळेचा सहभाग असल्याने त्याच्या तपासासाठी त्याला तालुका पोलीसांकडे सोपविण्यात आले होते. या दरम्यान त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत १५ मे रोजी पळ काढला होता. मातोरी गावात घरफोडीची कबुली कवळे याने दिली होती. तसेच दरोड्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यामधील संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर मातोरी घरफोडीच्या तपासासाठी तालुका पोलिसांनी कवळे यास ताब्यात घेतले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली जयेश भाबड, योगेश शिंदे यांचे पथक पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी तयार केले. फरार कवळेचा सर्वत्र शोध घेत त्याच्या मागावर पथक रवाना करण्यात आले होते. तब्बल महिनाभर या पथकाने जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यामधील गावे पिंजून काढली. अखेर एका गुप्त बातमीदाराकडून पथकाला खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा गाठला. या भागात मिळालेल्या माहितीवरून सर्व संशयास्पद ठिकाणी कवळेचा शोध स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने घेतला. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात असलेल्या मंगरूळ गावात पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. कवळे हा दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तब्बल महिनाभरानंतर कवळेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. हा सराईत दरोडेखोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात जबरी लूट, घरफोडी, दरोडे यांसारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले