शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७७ हजार जागांवर अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अकरावीच्या ७७ हजार ५० जागांसाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दहावीच्या परीक्षेला मुकलेल्या जवळपास ९९ हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर अखेर राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील २५ हजार २७० जागांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५१ हजार ८०० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीत ५२ हजार ८०३ मुले, तर ४६ हजार १४६ हजार मुली असे एकूण ९८ हजार ९४९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षाच रद्द झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाटी सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे त्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याने या विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

--

पॉईंटर

शहरातील कनिष्ठ महाविद्यालये -६०

शहरातील अकरावीच्या जागा - २५,२७०

ग्रामीण भागात कनिष्ठ महाविद्यालये -२५०

ग्रामीण भागात अकरावीच्या जागा - ५१,८००

---

दहावीचे विद्यार्थी - ५२,८०३

दहावीच्या विद्यार्थिनी - ४६,१४६