शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

भेंडी येथील वातानुकूलित सुविधा केंद्रातून आता शेतमाल थेट परदेशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:15 IST

कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळिंब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने या केंद्रातून आता थेट अमेरिका, यूरोप, हॉलंड व इतर देशात द्राक्षे, डाळिंब निर्यात होणार आहेत. परिणामी हॉलंडच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची पाऊले कळवण तालुक्याच्या दिशेने पडू लागली आहेत.

ठळक मुद्देहॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा या दोन व्यापाºयांनी द्राक्षबागेची पाहणी केली

कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळिंब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने या केंद्रातून आता थेट अमेरिका, यूरोप, हॉलंड व इतर देशात द्राक्षे, डाळिंब निर्यात होणार आहेत. परिणामी हॉलंडच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची पाऊले कळवण तालुक्याच्या दिशेने पडू लागली आहेत.भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी आठ एकरात गुणवत्तापूर्ण व एक्स्पोर्ट जम्बो ब्लॅक जातीची द्राक्ष लागवड केली असून, हॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा या दोन व्यापाºयांनी द्राक्षबागेची पाहणी केली आहे.मेटा आणि लॅमी समा हे दोघे व्यापारी सध्या भारतातून यूरोपमध्ये मासे, डाळिंब व इतर फळे निर्यात करीत असतात. मोरोक्को आणि इस्रायलमधून डाळिंब खरेदी करून जगभरात पाठवित असल्याने कळवण तालुक्यातील त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.कळवण तालुक्यात गुणवत्तापूर्वक द्राक्ष व डाळिंब पिकवले जातात. यूरोप, जर्मनी, जपान, बेल्जियम, अमेरिका येथे द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने तेथे द्राक्ष जावीत यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिक आग्रही असतात; मात्र द्राक्ष यूरोप व अन्य ठिकाणी न जाता व्यापारी अन्य देशांत पाठवावी लागतील, असे सांगून भाव कमी करण्याचे उद्योग करतात त्यामुळे भेंडी केंद्राला कृषी व प्रक्रि या अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणने मान्यता दिल्याने भेंडी येथून यूरोपसह अन्य ठिकाणी द्राक्ष व डाळिंब निर्यात होणार असल्याने हॉलंडच्या व्यापाºयांनी कळवणला द्राक्षबागांची पाहणी केली. भेंडी येथील निर्यात सुविधा केंद्राला परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन शीतगृह व कांद्याची प्रतवारी करणाºया मशिनरीची पाहणी केली. तालुक्यातील द्राक्ष विक्रीसाठी तयार होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने या परदेशी व्यापाºयांनी जानेवारी महिन्यापासून कळवण तालुक्यातून द्राक्ष खरेदी करणार असल्याचे सांगितले. परदेशी पाहुण्यां-समवेत तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे सभापती निंबा पगार, रवींद्र हिरे, लाला पगार, कामेश पगार आदींसह पंचक्र ोशीतील द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.परदेशी पाहुण्यांनी द्राक्षबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जम्बो ब्लॅक व्हरायटी आठ एकर क्षेत्रात लागवड केली आहे. फळधारणेचे पहिलेच वर्ष आहे. साधारण एक महिन्यात फळ विक्र ीस तयार होणार आहे. एकरी दहा टन उत्पन्न अपेक्षित असून, परदेशात एक्स्पोर्ट करणार आहे. - कामेश पगार, युवा शेतकरी कळवणपणन व्यवस्थापक सुनील पवार यांच्या सहकार्याने हॉलंड येथील व्यापारी नाशिक जिल्ह्यात आले आहेत. भाजीपाला, द्राक्ष व डाळिंब खरेदी करून परदेशात निर्यात करणार आहेत. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करणार आहेत. - प्रशांत नहारकर, संचालक, सद्गुरु अ‍ॅग्रो