शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडुन जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:14 IST

नाशिक: देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडीकल कॉलेज, ...

नाशिक: देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडीकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. केंद्रीय वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. पुष्पेंद्र वर्मा आणि सहायक संचालक डॉ. साहिल गोयल यांना मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय आणि मेडीकल कॉलेजमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.

या केंद्रीय वैद्यकीय पथकाने गुरुवारी सायंकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यावेळी शहरात ऑक्सिजन बेडअभावी होणारे रुग्णांचे हाल, व्हेंटीलेटरचा तुटवडा, रेमडेसिवीरची उणीव अशा सर्व बाबींवर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच या वैद्यकीय पथकाने आडगाव मेडीकल कॉलेजमधील कोरोना केंद्र, तेथील लॅबोरेटरीला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. रेकॉर्ड्स, स्वॅब कुठे कसे ठेवले जातात, त्याबाबतच्या माहितीचाही आढावा कॉलेजच्या डीन डॉ. मृणाल पाटील यांच्याकडून घेतला. तसेच या सर्व बाबी खासगी लॅबोरेटरीप्रमाणे आदर्श आणि एकसमान पद्धतीने व्हाव्यात अशी अपेक्षादेखील या पथकाने व्यक्त केली.

इन्फो

सिव्हीलच्या कोरोना लॅबची पाहणी

मेडीकल कॉलेजनंतर या पथकाने जिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी पथकाने जिल्हा रुग्णालयाचा कोरोना विभाग, कोविड सॅम्पलिंग लॅबोरेटरी अशा सर्व स्थानांना भेट देऊन तेथील कामकाजाची पद्धती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनदेखील त्यांनी बघितले. नूतन तसेच रुग्णालयातील बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांची मतेदेखील या पथकाने जाणून घेतली. त्यानंतर पथकाने महापालिकेला भेट देऊन मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच नोडल ऑफीसर डॉ. आवेश पलोड यांच्याशी देखील चर्चा केली.

इन्फो

फळविक्रेत्याची केली तपासणी

आडगाव मेडिकल कॉलेजवरुन परतताना संबंधित पथकाने मुंबई नाक्याजवळ उतरुन अचानकपणे तेथील फळविक्रेत्यांची पाहणी करुन मास्क लावले आहेत की नाही, त्याची तपासणी केली. तसेच एका विक्रेत्याचा मास्क नाकापासून खाली आलेला असल्याने त्याला मास्क व्यवस्थित लावण्यास सांगितले. त्याशिवाय सायंकाळी त्यांनी त्रिमुर्ती चौकातील भाजीबाजाराचीदेखील पाहणी केली.

इन्फो

गोविंदनगर कंटेन्मेंट झोनला भेट

या पथकाने शहरात नुकतेच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडलेल्या गोविंदनगरच्या कंटेन्मेंट झोनला भेट दिली. या भेटीदरम्यान पथकाने बाधित नागरिकांशी चर्चा, मनपाने केलेल्या नोंदी या सर्व बाबींची पडताळणी केली. तसेच मनपाकडून किती वेळा औषध फवारणी, धुरळा फवारणी झाली याबाबतदेखील पथकाने कसून चौकशी करीत त्याच्या नोंदी करुन घेतल्या.