शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरवाढीची केंद्राला धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:26 IST

गेल्या पंधरवड्यापासून कांदा लिलावात तेजी निर्माण होऊन परिणामी बाजारात कांद्याने चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: आॅक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा चढ्या भावातच स्थिर राहण्याच्या शक्यतेने केंद्र सरकार धास्तावले असून, शुक्रवारी केंद्रीय कृषी व पणन मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशकात धाव घेऊन कांद्याच्या सातत्याने होणाºया दरवाढीचे गणित समजावून घेतले आहे.

नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून कांदा लिलावात तेजी निर्माण होऊन परिणामी बाजारात कांद्याने चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: आॅक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा चढ्या भावातच स्थिर राहण्याच्या शक्यतेने केंद्र सरकार धास्तावले असून, शुक्रवारी केंद्रीय कृषी व पणन मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशकात धाव घेऊन कांद्याच्या सातत्याने होणाºया दरवाढीचे गणित समजावून घेतले आहे.जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये व विशेष करून निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याला क्व्ािंटलमागे सरासरी २००० ते २४०० रुपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, मात्र लिलावानंतर खुल्या बाजारात विकला जाणारा कांदा थेट ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून, त्याचा सामान्य ग्राहकाला फटका बसू लागला आहे. विशेष करून उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याचे चढे दर त्या त्या राज्य सरकारांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. महाराष्टÑ वगळता अन्य राज्यांमध्ये पावसामुळे कांद्याची आवक घटली, परिणामी महाराष्टÑातील कांद्याने जवळपास देशातील प्रत्येक बाजारपेठेवर कब्जा केला आहे. येणाºया दोन महिन्यांत हीच परिस्थिती कायम राहणार असून, सध्या खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कांदा नजीकच्या काळात दुप्पटीने विक्री होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करू लागले आहेत. कांदा रडविण्याच्या शक्यतेने केंद्र सरकारने अभ्यास सुरू केला असून, त्यासाठी कृषी व पणन मंत्रालयाने कांद्याच्या चढ्या दरामागचे गणित समजावून घेण्यासाठी नाशिक गाठले. अभयकुमार व सुरेंद्र सिंग या दोन अधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेऊन कांदा लिलावाची पद्धती व दर ठरविण्याची प्रणाली जाणून घेतली. यावेळी बाजार समित्यांचे संचालक तसेच व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांशीही या पथकाने चर्चा केली. देशातील सर्वच राज्यांमधून कांद्याची मागणी वाढल्यामुळे त्या प्रमाणात होत असलेली आवक पाहून व्यापारी कांदा लिलावाचे दर ठरवित असल्याचे या पथकाला सांगण्यात आले, त्याचबरोबर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्णातून अन्य ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कांद्याची व्यापाºयांकडून साठवणूक केली जात असल्यामुळे दरवाढ झाल्याचा समज घेऊन आलेल्या या केंद्रीय पथकाला व्यापाºयांनी त्यांची बाजूही समजावून सांगितली. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे व्यापारी कांद्याची साठवणूक करू शकत नाही हे त्यांना पटवून देण्यात आले, शिवाय तसे झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कांद्याची बेकायदेशीर साठवणूक करणे गुन्हा ठरविण्यात आल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर या पथकाने लासलगाव बाजार समिती व तेथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांशीही संवाद साधला.आॅक्टोबरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणारखरिपाच्या कांद्याची सध्या लागवड करण्यात आलेली असून, तीन महिन्यांपूर्वी भाव पडल्याने शेतकºयांनी साठवून ठेवलेला कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी आणला आहे. नवीन कांदा येण्यास आॅक्टोबर महिना उजाडणार आहे. महाराष्टÑातील कांद्याला पश्चिम बंगाल, हरियाणा, ओरिसा, बिहार, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अधिक मागणी आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांत फक्त ३५ रॅक पाठविणाºया नाशिक जिल्ह्णातून यंदा गेल्या तीन महिन्यांत १७२ कांद्याचे रॅक रवाना करण्यात आले आहेत.