शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
4
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
5
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
6
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
7
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
8
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
9
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
10
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
12
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
13
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
14
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
15
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
16
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
17
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
18
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
19
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
20
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

मनसे नगरसेवकांची शिरगणती

By admin | Updated: November 4, 2014 00:15 IST

फुटीचा संशय : ‘कामे करू, पण पक्ष सोडू नका’; वसंत गिते यांना शह देण्याचा प्रयत्न्

नााशिक : वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नगरसेवकदेखील त्यांच्या बरोबर जाणार असल्याच्या चर्चेमुळे मनसेने सर्वच नगरसेवकांना तातडीने पाचारण करून ओळखपरेड घेतली. ३३ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. गिते यांनी पक्षाचा नाही, पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. उलट महापौरपद मनसेकडे असल्याने उर्वरित अडीच वर्षांत नागरी कामे करून बॅकलॉग भरून काढू, असे सांगून या नगरसेवकांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला.विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते यांचे नाराजीनामा नाट्य रंगले, तेव्हादेखील गिते समर्थक नगरसेवक राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येणार होते. त्यामुळे अशीच स्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईहून चक्रे फिरली आणि तातडीने महापालिकेतील मनसे गटनेता कार्यालयात या नगरसेवकांना तातडीने साडेचार वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले. राजीव गांधी भवनातील मुख्यालयात आयोजित या बैठकीस महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती तथा मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई आणि माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ उपस्थित होते. यावेळी महापौर मुर्तडक यांनी गिते यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पक्षाचा नाही. त्यामुळे कोणीही संशय घेऊ नये. पालिकेत मनसेची सत्ता आहे. गेल्या अडीच वर्षांत अडचणी आणि साडेसातशे कोटींचा स्पील ओव्हर यामुळे कामे होऊ शकली नाहीत. परंतु आता मात्र कामे होतील, असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी गिते हे पक्षाचे नेते असल्याने त्यांना पुन्हा जबाबदारी दिली जावी यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे सांगितले, तर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि गटनेता अशोक सातभाई यांनी गिते यांच्या राजीनाम्यामुळे पालिकेच्या सत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगितले. तरीही कोणाला काय भावना व्यक्त करायच्या असतील तर कराव्या, असे सांगितले. परंतु अरविंद शेळके यांनी घंटागाड्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर पक्षाबरोबरच सर्वांनी राहावे, असा एकसंधपणा दाखवावा, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)