शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या आवारात दफनविधीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील देवळाणे येथे शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी वेळीच दफनविधीसाठी अन्य ठिकाणी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिल्याने आदिवासी बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत वृद्धावर शांततेत अंत्यसंस्कार केले.बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील भिल्ल आदिवासी समाजासाठी दफनभूमीची मोठी समस्या आहे. अनेकवेळा ग्रामसभेत आदिवासींसाठी गावठाणमधून जागा काढून देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठरावालाच केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्र वारी रात्री देवळाणे येथील आदिवासी वस्तीत राहणारे रु ंझा पंजा सोनवणे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण समाज एकवटला होता. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते .त्यासाठी बाहेरगावातील नातेवाईक ,समाजातील बांधवांनी गर्दी केली होती. अंत्यविधीसाठी युवराज वाघ यांच्या शेतालगत नदीपात्रात तयारी सुरु असतांना त्याला गावातील काही लोकांनी मज्जाव केल्याने उपस्थित समाजबांधव आणि महिलांच्या भावना भडकल्या . संतप्त झालेल्या तीनशे ते चारशे महिला व पुरु षांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावरच हल्लाबोल केला. आणि कार्यालयाला घेराव घालून आम्हाला दफनभूमीची जागा द्या अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह दफन करू . काही तरु णांनी टिकाव ,फावडे घेऊन खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच हरी रामदास देवरे ,भाऊसाहेब शिरसाठ आदींनी आदिवासींना बांधवाना शांततेचे आवाहन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र संतप्त महिला व पुरु ष आपल्या भूमिकेवर ठाम होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटलांनी पोलिसांना पाचारण केले. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चार तास उलटूनही तोडगा निघत नव्हता. दुसरीकडे मृतदेहाची हेळसांड होत असल्यामुळे आदिवासींच्या भावना अधिकच भडकल्या संतप्त जमाव पोलिसांवर चालून आला. हा प्रकार पाहून पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी तत्काळ प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना पाचारण केले. धिवरे यांनी उपसरपंच देवरे ,ग्रामसेवक हिरे आणि आदिवासी बांधवांची बैठक घेतली. यावेळी शेतकरी युवराज वाघ यांनी मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून आपल्या शेतालगत पूर्वीच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन करून विधी आटोपून जागेबाबत तोडगा काढू अशी सामंजस्याची भूमिका घेतल्याने अंत्यविधीचा मार्ग मोकळा करण्यात आला.