शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडीजवळ रेल्वे रुळावर सीमेंटचा दगड; दुर्घटना टळली

By admin | Updated: February 12, 2017 00:55 IST

खेरवाडीजवळ रेल्वे रुळावर सीमेंटचा दगड; दुर्घटना टळली

निफाड : मुंबई-भुसावळ मार्गावरील निफाड तालुक्यातील खेरवाडी ते ओढा दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर १५ किलो वजनाचा सिमेंटचा दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानाने फसला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.मुंबईला जाणारी हावडा कुर्ला एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १२.४५ वाजेदरम्यान खेरवाडी ओढा रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्र . २०२/४ या ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवरील सिमेंटचा मैलाचा दगड क्र . २०२ हा अज्ञात व्यक्तीने रेल्वे रूळावर ठेवलेला होता. हावडा कुर्ला एक्स्प्रेस खेरवाडी ते ओढा या दरम्यानच्या मार्गावरून जात असताना ट्रॅकवर दगड असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने दुरूनच तातडीने ब्रेक लावला परंतु तरीही रेल्वेचे चाक या दगडावर गेले आणि दगडाचे दोन तुकडे झाले. त्यातील एक तुकडा रेल्वे इंजिनच्या जाळीवर येऊन पडल्याने जाळीचा काही भाग तुटला रेल्वे थांबवल्यानंतर चालकाने खाली उतरून परिस्थिती पाहिली आणि नंतर एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनला आणून ही माहिती दिली. शनिवारी सकाळी रेल्वे पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, पोलीस उपअधीक्षक वळवी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांडवकर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक के. एस. निर्मल आणि एटीएस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकही आणले परंतु संबंधित गुन्हेगारांचा तपास लागला नाही. हे प्रकरण नाशिकरोड रेल्वे स्टेशनला वर्ग करण्यात येणार आहे.हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडीचा वेग कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या ठिकाणी रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेतील प्रवाशांना हा प्रकार समजल्यानंतर काहीसे भीतीचे वातावरण झाले होते. मुंबईत रेल्वे रूळावर पोल ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर ग्रामीण भागात झालेला हा प्रकार नेमका कोणत्या अज्ञात व्यक्तीने आणि कशासाठी केला या बाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.