शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:56 IST

नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे.

ठळक मुद्देमनमाड-नांदगाव रस्ता : पितळ उघडे; वाहनधारकांसह पायी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय

नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे.हा रस्ता २.५ किमी लांबीचा असून, नांदगाव शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मनमाडकडून येणारी वाहने शनिमंदिराकडून शहरात प्रवेश करतात. त्यासाठी एक रस्ता शाकांबरी नदीतूनही आहे. याला पर्याय म्हणून शहराच्या अलीकडे सुमारे तीन किमी अंतरावर मनमाडकडून येणाºया मुख्य रस्त्यापासून (राष्टÑीय महामार्ग) फाटा फुटून जगधने वाडामार्गे शहरात प्रवेश करता येतो. यामुळे सुमारे एक ते दीड किमी अंतर कमी होते. रस्ता थेट शहराच्या देवीमंदिराजवळ निघत असल्याने वेळ वाचतो व शनिमंदिराकडून येणारी रहदारीची कोंडी कमी होते; मात्र पाऊस नसतानाही वाहनधारकांना व पादचाºयांना या मार्गावरून पाण्यातून जावे लागते. ही खरी समस्या आहे.नाल्याच्या पात्रातून सुमारे १०० ते १५० मीटर लांबीचा रस्ता जातो. उर्वरित रस्ता डांबराचा असला तरी नदीपात्रातला रस्ता सिमेंट कॉँक्रीटचा बनवण्यात आला आहे. नैसर्गिक उतारावरून जाणारे पाणी कॉंक्रीटच्या रस्त्यावरून प्रवास करत पुन: नाल्याच्या मूळ वळणावर येऊन पुढे वाहत जाते. पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहणे अपेक्षित असले तरी नालापात्रात रस्ता बनवून त्यावरील पाण्यातून वाहतूक करणे हे या रस्त्याच्या आराखड्याचे वैशिष्ट्य बनले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी गटार तयार करून त्यातून नाल्याचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करता आली असती, असा प्रश्न जगधने वाडा व नांदगाव शहरातील नागरिकांना पडला आहे.रस्त्याच्या जडणघडणीत अडचणींवर मात करणारे कॉँक्रीट तंत्रज्ञान वापरले गेले की तंत्रज्ञानातल्या अपूर्ण जाणिवांचे प्रदर्शन दोन महिने रस्त्यावरून वाहणाºया पाण्यामुळे नागरिकांना झाले आहे. या विचारात शेवाळलेल्या रस्त्यावरून दुचाकीधारक असोत की पायचारी दोघांना कसरत करावी लागते हे खरे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी