शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट

By admin | Updated: July 28, 2016 00:41 IST

ग्रामस्थ आक्रमक : अधिकारी, ठेकेदाराविरु द्ध कारवाईची मागणी

 पिळकोस : कळवण तालुक्यातील रवळजी येथे तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या सीमेंट प्लग बंधाऱ्यातून नुकत्याच झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी रवळजीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निकृष्ट बांधकामासंदर्भात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. संबंधितांकडून याची कुठलीच दखल घेतली न गेल्यामुळे आता गावातील शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे दाद मागण्यास जाणार असल्याचे व त्यानंतर ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाईसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात येत्या दोन-तीन दिवसांत ग्रामस्थांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थ आणि भालेराव यांच्याकडून सांगण्यात आले.कळवण तालुक्यात जलसंधारणाची जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत; मात्र या कामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होईल अशा पद्धतीने तालुक्यात कामे केली गेली आहेत, असे आरोपही सर्वत्र होत आहेत. लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व एजन्सी यांचे एकमेकात हितसंबंध जुळल्याने निकृष्ट कामाची मालिका सुरू आहे. तालुक्यातील रवळजी येथे मोठ्या नाल्यावर लक्षावधी रु पये खर्च करून सीमेंट प्लग बंधारा बांधण्यात आला. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे बंधारा पूर्णपणे भरला. परंतु निकृष्ट कामाचा नमुना असलेल्या या बंधाऱ्यात पावसाचे पाणी साचले खरे; पण या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला आहे. यामुळे जलसंधारण करण्याच्या मूळ उद्देशाला कळवण तालुक्यात हरताळ फासला गेला आहे.रवळजी येथे बांधण्यात आलेला सीमेंट प्लग बंधारा एप्रिल महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आला. बंधारा तयार करतेवेळी यात मोठ्या प्रमाणात दगड टाकण्यात आले. याबद्दल भास्कर भालेराव यांनी स्वत: संबंधित विभागाकडे तोंडी तक्रार केली; मात्र याकडे दुर्लक्ष करत कुठलाही संबंधित विभागाचा अधिकारी कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी आला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीला न जुमानता, ठेकेदाराला पाठीशी घालून बंधारा कामात दगड वापरणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले, असा आरोपही ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी व ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी असून, येत्या दोन-तीन दिवसांत याची चौकशी सुरू न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना बंधारा गळतीबाबत निवेदन देऊनही त्यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला कुठलीच दाद दिली नसून त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे रवळजी गावाचे शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे अधिकारी व ठेकेदार यांच्याविरु द्ध दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)