पंचवटी : छत्रपती शिवाजी महाराज की जय हो, जय शिवाजी जय भवानी असा जयघोष करून पंचवटीत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 387 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने मित्रमंडळांनी परिसरात भगवे ध्वज व भगव्या पताका लावल्याने परिसरात भगवे वातावरण पसरले होते. पंचवटी परिसरातील चौकाचौकात शिवजयंती निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात येऊन विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. मध्यरात्री बारा वाजतात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा दिल्या. बुधवारी सकाळी मान्यवर तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पंचवटी परिसरातील गजानन चौक मित्रमंडळ, सेवाकुंज मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ, मालविय चौकातील धुम्रवर्ण फ्रेंड सर्कल, गुरूदत्त शैक्षणिक, सामाजिक कला, क्रिडामंडळ, मालेगाव स्टँन्ड मित्रमंडळ, शंभूराजे फ्रेंड सर्कल, सरदारचौक मित्रमंडळ, हिरावाडी मित्रमंडळ, भगवती शैक्षणिक कला, क्रिडामंडळ, आदिंसह मेरी, म्हसरूळ, आडगाव, नांदूर मानूर, तारवालानगर, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, पंचवटी कारंजा, आदिंसह परिसरातील सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.