शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅपी न्यू इयर’चा जल्लोष

By admin | Updated: December 31, 2015 23:43 IST

थर्टी फर्स्टची झिंग अन् सरत्या वर्षाला निरोप

नाशिक : तपमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊन पोहोचलेले, विद्युत रोषणाईने नटलेले शहर आणि सोबतीला बेधुंद करणारी संगीताची धून अशा बहरलेल्या वातावरणात ‘थर्टी फर्स्ट’ची झिंग उत्तरोत्तर चढत गेली. मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला असंख्य अग्निफुलांनी आसमंत प्रकाशमान झाला आणि चांगल्या-वाईट आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन नाशिककरांनी सरत्या वर्षाला निरोप देत ‘हॅपी न्यू इयर’चा एकच जल्लोष केला. सरत्या वर्षात आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांबद्दल आत्मचिंतन करत नाशिककरांनी ‘नववर्ष सुख-समृद्धी आणि नवचैतन्य घेऊन येवो’ अशी शुभकामना व्यक्त केली. ३१ डिसेंबरचा दिवसच मुळात उगवला तो नववर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी. शासकीय-निमशासकीय कार्यालयातही उपस्थिती जेमतेमच. तरुणाईसाठी तर थर्टी फर्स्टची रात्र पर्वणीच घेऊन आलेली. दुपारपासूनच वाइनशॉप्सवर झुंबड उडाली. बॅँकांच्या एटीएम केंद्रांपुढेही पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या. केकशॉप्स, मिठाईची दुकाने गजबजली. जल्लोषाच्या नियोजनाची लगीनघाई सरत्या वर्षातील दिनकर मावळतीला लागल्यानंतर गतिमान झाली आणि शहरातील हॉटेल्स, बार येथे खवय्यांनी मैफल जमवण्यास सुरुवात केली. सोबत संगीताच्या तालावर आबालवृद्धांनी फेर धरला आणि मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला जल्लोषाला उधाण आले.