नाशिकरोड : प्रताप गडाच्या रणसंग्रामात जिवाची बाजी लावणारे शूर शिलेदार जिवा महाला यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पुतळा येथे नाभिक समाजाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी शूर शिलेदार जिवा महाला यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पुतळा येथे प्रतिमेचे पूजन आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख नितीन चिडे, युवा जिल्हा अध्यक्ष राहुल ताजनपुरे, नाभिक समाजाचे शांताराम जाधव, नंदू कोल्हटकर, राहुल तुपे, अरुण सौंदाणे, रितेश जाधव, बंटी मोरे, समाधान वाघ, गणेश पवार, संदीप चित्ते, लक्ष्मण जाधव, जयेश आपार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिवा महाला यांची जयंती साजरी
By admin | Updated: October 10, 2015 22:41 IST