सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मविप्र समाज ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर ठेवून केवळ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. याप्रसंगी पांडुरंग सोनवणे, लालचंद सोनवणे, किशोर कदम व उपप्राचार्य डॉ. बी.आर. पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनीता शेवाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बी. आर. पवार यांनी केले.
सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:15 IST