शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शब-ए-बारात शांततेत साजरी करा अजय मोरे : मालेगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST

आझादनगर : आगामी शब-ए-बरात दरम्यान सर्व विभागाकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शब-ए-बरात शांततेत साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले.

ठळक मुद्देसर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभाग प्रमुखांनादुप्पट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे

आझादनगर : आगामी शब-ए-बरात दरम्यान सर्व विभागाकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शब-ए-बरात शांततेत साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. शब-ए-बरातनिमित्ताने बडा कब्रस्तान येथे बुधवारी रात्री घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, विश्वस्त अ‍ॅड. नियाज लोधी, हरिष मारू उपस्थित होते. प्रांत मोरे पुढे म्हणाले की, मागील काही वर्षाचा अनुभव पाहता व नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करीत सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले. नागरिकांच्या सुरक्षेस्तव प्रशासनास प्रसंगी कठोर भूमिकाही घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सण शांततेत साजरा करावा. अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, शब-ए-बरात निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या भिकाºयांची संख्या लक्षात घेता त्यांना मनमाड रेल्वेस्थानकावरच थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.शहरातील पाचही कब्रस्थान व परिसरात गत वर्षाच्या तुलनेत दुप्पट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. कब्रस्तानाच्या प्रवेशद्वारालगतचे व रस्त्यावरील अतिक्रमण येत्या एक-दोन दिवसात मनपाकडून काढण्यात येणार आहे. मागील काही घडलेल्या घटनांमुळे व माझ्या सेवा कार्यकाळात प्रथमच शब-ए-बरात येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रीय करण्यात आले आहे. यावेळी बंदोबस्ताबाबत व इतर सुविधांबाबत पोद्दार यांनी माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक गजानन राजमाने, कब्रस्तानचे विश्वस्त अ‍ॅड. नियाज अहमद लोधी, पोलीस निरीक्षक मसुद खान, रियाज अन्सारी, शांतता समिती सदस्य गुलाब पहेलवान आदिंचे भाषणे झाली. या बैठकीस मौलाना जमाली, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी नागरिक उपस्थित होते.