नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकरसंक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत करण्यात आले.भारतीय संस्कृतीत या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यानुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. हिवाळा ऋतुत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज भासते. त्यामुळे यादिवशी तीळ-गूळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रुजली आहे. शहरातही पारंपरिक पद्धतीने ही प्र्रथा पार पाडत संक्रांत पार पाडली गेली. एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. काळ्या रंगाची साडी नेसून सुगड्याचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली. तसेच महिलावर्ग संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत साजरी केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकवाच्या प्रथेला यादिवसापासून सुरुवात केली गेली. (प्रतिनिधी)
शहरात मकरसंक्रांत उत्साहात साजरी
By admin | Updated: January 15, 2015 23:50 IST