शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांसह धनत्रयोदशी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:19 IST

दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी. कुबेराचे पूजन, धनाचे, हत्यारांचे पूजन, अकाली मृत्यूपासून कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी कणकेच्या दिव्याचे प्रज्वलन, आरोग्यदेवता धन्वंतरी जयंतीनिमित्त पूजा आदींनी धनतेरस अर्थात धनत्रयोदशी मंगळवारी (दि. १७) शहरात उत्साहात साजरी झाली. व्यापारीवर्गाकडून यानिमित्त कुबेराचे पूजन करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांनी सकाळी १०.४० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणाºया विविध मुहूर्तांवर धन व वहीपूजन केले.

नाशिक : दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी. कुबेराचे पूजन, धनाचे, हत्यारांचे पूजन, अकाली मृत्यूपासून कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी कणकेच्या दिव्याचे प्रज्वलन, आरोग्यदेवता धन्वंतरी जयंतीनिमित्त पूजा आदींनी धनतेरस अर्थात धनत्रयोदशी मंगळवारी  (दि. १७) शहरात उत्साहात साजरी झाली. व्यापारीवर्गाकडून यानिमित्त कुबेराचे पूजन करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांनी सकाळी १०.४० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणाºया विविध मुहूर्तांवर धन व वहीपूजन केले.  धनत्रयोदशीपासून वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते म्हणून धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. नव्या वर्षाच्या हिशेबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करण्यात आले. व्यापारी, दुकानदार यांनी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे यांची पूजा केली. शेतकºयांसाठी नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असल्याने त्यांनी नवीन धान्याची पूजा करण्यावर भर दिला. यावेळी धने व गूळ यांचा नैवेद्य दाखविण्यात आला.  मृत्यू हा कुणालाच टळलेला नाही. पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये. याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावला जातो. याला यमदीपदान असे म्हटले जाते. घरोघरी या यमदीपदानाच्या परंपरेचे पालन करण्यात आले. धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेद दवाखान्यांमध्ये धन्वंतरी देवतेचे पूजन, प्रार्थना व आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांना गूळ, कडुनिंबाचा पाला, धने आदींचा आरोग्यदायी प्रसाद देण्यात आला. काही ठिकाणी दवाखान्यांमधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्नेहभोजन, दिवाळी भेट, मिठाई, बोनस आदींचे वाटप करण्यात आले. याशिवाय वर्षभर राबविण्यात आलेले उपक्रम, स्पर्धा यातील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. धनत्रयोदशीचा मुख्य कार्यक्रम आयएमए हॉल व पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालय येथे दुपारी पार पडला. याठिकाणी धन्वंतरी पूजन, प्रार्थना, प्रासंगिक भाषणे आदी कार्यक्रम झाले.