शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सीसीटीव्हीस मान्यता

By admin | Updated: January 18, 2017 00:05 IST

मुंबईतील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सीसीटीव्हीस मान्यता

नाशिक : शहरातील कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली निघण्याची शक्यता आहे़ मंगळवारी (दि़१७) मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत शहरातील ३१८ ठिकाणी एक हजार दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त असून, शहर पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्ताव लवकरच माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठवून त्याचा अभ्यास केला जाणार आहे़  सिंहस्थासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते़ यामुळे शहरातील गर्दीसोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात वा चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते़ मात्र सिंहस्थात तात्पुरत्या अर्थात भाडेतत्त्वावर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही नंतर काढून घेण्यात आले़ या प्रश्नावर मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांनी अनेकदा शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्याचे सुतोवाच केले होते़ त्यानुसार पोलिसांनी सविस्तर व विस्तुत अहवालही शासनास सादर केला मात्र त्यावर निर्णय होत नव्हता़  राज्यातील काही शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरु झाली असली तरी नाशिकमध्ये तशा कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या़ तसेच याबाबत विधीमंडळ अधिवेशनातही ठोस निर्णय न झाल्याने शहरातील सीसीटीव्हीचा प्रश्न प्रलंबित पडला होता़ दरम्यान, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली असून, पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)