शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्याच्या देवमामलेदार यात्रोत्सवावर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:19 IST

सटाणा : येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी देवमामलेदार देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे.

सटाणा : येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी देवमामलेदार देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे. यात्रोत्सवासाठी राज्य तसेच परराज्यातून दाखल होणारे भाविक, यात्रेकरू व व्यापार्?यांना विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच देवस्थान समिती सज्ज झाली आहे.देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसर व यात्रोत्सव परिसरावर ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेरांचे संपुर्ण नियंत्रण यात्रोत्सवात उभारण्यात येणाऱ्या विशेष पोलिस चौकीत होणार आहे.रविवारी (दि. २२) पासून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवात अभूतपूर्ब उत्साहात सुरु वात होत आहे. त्या पाशर््वभूमीवर पालिका प्रशासन व देवस्थान ट्रस्टने शहरातील आरमनदी पात्रालगत असलेले मैदान स्वच्छ केले आहे. देवमामलेदारांच्या मंदिरावर तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन रंगरगोटी व स्वच्छता देखील पुर्ण झाली आहे. यात्रा पटांगणात अनेक वर्षापासून सांड पाणी साचत होते. त्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने भूमिगत गटार केल्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. त्यामुळे रोगराई पूर्णपणे मिटणार आहे. दरम्यान देवस्थान ट्रस्टतर्फे राज्य तसेच परराज्यातून येणार्?या व्यवसायिकांना दुकाने,पाळणे व इतर मनोरंजनात्मक दुकाने उभारण्यासाठी जागा वाटप करणे सुरू आहे. देवस्थानतर्फे तीनशेहून अधिक दुकानांसाठी जागा वाटप केली जाणार असून व्यावसायिकांकडून मात्र नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याची देवस्थान काळजी घेत आहे. पालिका प्रशासनातर्फे यात्रोत्सवासाठी दरवर्षी 51हजार रूपये देवस्थान ट्रस्टला दिले जातात.सटाणा पोलिस ठाण्यातर्फे यात्रा यात्रोत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच यात्रा परिसरात दिवसा व सायंकाळी महिला व तरु णींची छेडछाड होवू नये, चोरी व गैरप्रकार टाळण्यासाठी जायखेडा, वडनैर भैरव आदी पोलिस ठाण्यातुन अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली आहे. यात पोलिस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, ५० पोलिस व २० महिला पोलिसांचा फौजफाटा दाखल होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून यात्रोत्सवातील कुस्ती दंगलीत महिला व तरु णी कुस्तीगीरांचा सहभाग बघता मोठ्या गर्दीचा अंदाज आहे. त्यामुळे कुस्ती दंगलीसाठी आरम नदीपात्रात विस्तीर्ण मैदान तयार केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक