शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दाटवस्तीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आता सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:42 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यात पूर्वदक्षता घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आणि एकही संशयित रुग्ण झोपडपट्टी परिसरात किंवा अन्यत्र असू नये यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यातून नऊ बाधित प्रशासनाला आढळले. त्यातून त्यांच्यावर उपचार तर सुरू करण्यात आला, परंतु संसर्गदेखील टाळता आला आहे. त्याही पुढे जाऊन प्रतिबंधित दाट वस्तीत संसर्ग वाढू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमनपाची शोधमोहीम : घर सर्वेक्षणात आढळले नऊ बाधित

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यात पूर्वदक्षता घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आणि एकही संशयित रुग्ण झोपडपट्टी परिसरात किंवा अन्यत्र असू नये यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यातून नऊ बाधित प्रशासनाला आढळले. त्यातून त्यांच्यावर उपचार तर सुरू करण्यात आला, परंतु संसर्गदेखील टाळता आला आहे. त्याही पुढे जाऊन प्रतिबंधित दाट वस्तीत संसर्ग वाढू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती आणि तिही विरळ वस्तीत होती. परंतु ज्यावेळी वडाळा आणि जुन्या नाशिकसारख्या दाट वसाहतीत रुग्ण आढळले. तेव्हा मात्र, महापालिका हादरली. मालेगावप्रमाणे शहरात सामुहिक संसर्ग होऊ नये यासाठी महापालिकेने सर्व झोपडपट्ट्या अणि दाटवस्तीचा भाग तपासणीचा निर्णय घेतला. वडाळा परिसरातूनच त्याची सुरुवात करण्यात आली.महापालिकेने यासाठी दोनशे वैद्यकीय पथके तयार केली असून, त्यामार्फत वडाळा, शिवाजीवाडी, क्रांतिनगर, जुने नाशिक अशा विविध भागांतील ३४ हजार ५१ घरांना भेटी दिल्या असून, १ लाख ५३ हजार २१४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेत थंडी खोकल्याचे रुग्णदेखील तपासले जात असून, आत्तापर्यंत साठ जणांना त्रास होतो असे कळल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात वडाळा येथे पाच, शिवाजी वाडीत एक आणि रामनगर येथे एक, तर क्रांतिनगर येथे दोन असे नऊ बाधित आढळले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. पूर्व दक्षतेमुळे संबंधितांचा वेळीच शोध लागला आणि त्यांच्यावर उपचार करताना अन्य कोणाला त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामुळे सामूहिक संसर्ग टळला आहे.दरम्यान, शहरातील वडाळा, शिवाजीवाडी, क्रांतिनगर अशा विविध दाट वस्तींच्या भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात संसर्ग टाळल्यास मदत होणार आहे. या सीसीटीव्हींचे नियंत्रण पोलिसांकडे देण्यात येणार आहे.प्रतिबंधित क्षेत्रात शौचालयसंसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या वतीने दक्षता घेतली जात असली तरी अनेक झोपडपट्टी भागात किंवा दाटवस्तीत सार्वजनिक शौचालयांमध्ये दूरवर जावे लागते. मात्र, त्यातून प्रतिबंधित क्षेत्रातून कोणी दूर जाऊ नये, यासाठी महापालिकेने आता प्रतिबंधित क्षेत्रातदेखील फिरते शौचालये आणून ठेवले आहेत. वडाळा, क्रांतिनगर, शिवाजीवाडी आणि रामनगर येथे अशाप्रकारची व्यवस्था राबविण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcctvसीसीटीव्हीcorona virusकोरोना वायरस बातम्या