शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सीसीटीव्हीत कैद होऊनही सापडेना गुन्हेगार पोलीस तैनात : नगरसेवकांच्या मोटारींची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:52 IST

इंदिरानगर : येथील राजीवनगर व रथचक्र चौक परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांच्या चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देयाप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेचार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले

इंदिरानगर : येथील राजीवनगर व रथचक्र चौक परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांच्या चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या या चारचाकी असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, समाजकंटक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीवनगरमधील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारच्या (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारच्या गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले़ दोन दुचाकींवरून आलेल्या या चार समाजकंटकांच्या हातात लाकडी दांडे होते़ पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे व पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ सकाळी ही वार्ता परिसरात पसरताच नागरिक व कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या घरी गर्दी केली होती़ परिसरात दहशत निर्माण करणाºया या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभाग ३० मधील कायदा व सुव्यवस्था तसेच परिसर भयमुक्त व्हावा यासाठी स्वखर्चाने चौकांमध्ये सुमारे २७ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत़ परंतु त्यांच्याच मोटारींच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले आहेत तरीही पोलिसांना ते सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.