शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या मिळकतींवर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:44 IST

महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, प्रमुख उद्याने आदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, प्रमुख उद्याने आदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.शहरातील प्रमुख चौकांसह बाजारपेठांमध्ये पोलीस आयुक्तालयामार्फत सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेनेही आपल्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेचे राजीव गांधी भवन, सहाही विभागीय कार्यालये,चार जलशुद्धीकरण केंद्र, १०५ जलकुंभ, प्रमुख उद्याने, प्रमुख वास्तू याठिकाणी बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेराचा नियंत्रण कक्ष पंचवटी विभागीय कार्यालयात उभारण्यात येणार आहे. सदर जागेची पाहणी गुरुवारी (दि.२४) मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व शहर अभियंता उत्तम पवार यांनी केली. महापालिका व पोलीस यंत्रणा यांनी स्वतंत्रपणे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.