शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: September 8, 2014 00:56 IST

सिडकोत मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर

 

सिडको : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्री गणरायास निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अंबड पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला असून, मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सिडको भागातून चार मंडळांनी सहभाग नोंदविला असून, बहुतांशी मंडळांकडून जागच्या जागी मिरवणूक काढण्यात येते. यंदाच्या वर्षी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे मिळून १२० सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. मुख्य मिरवणूक उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्य अ‍ॅडलॅब मार्गे आयटीआय पूल गणेश घाट असा असून, यात ओम गुरुदेव मित्रमंडळ, राजगड मित्रमंडळ, शांती विनायक मित्रमंडळ, इच्छापूर्ती मित्रमंडळांनी सहभाग नोंदविला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, यासाठी दोन पोलीस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड, १० महिला होमगार्ड आदिंचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली. गणेश विसर्जन घाटावर मोठा बंदोबस्त असणार आहे. तसेच सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांचादेखील सहभाग राहणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, किशोर सूर्यवंशी, भोई यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. नाशिकरोड त्याचप्रमाणे शहरातील मिरवणूक मार्गांवरदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पोलिसांकडून व्हिडीओ चित्रीकरणदेखील केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)