शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गृहखात्याच्या धोरणात अडकले सीसीटीव्ही कॅमेरे सहा कोटी देण्यात अडचण : पोलीस यंत्रणाही प्रतीक्षेत

By admin | Updated: May 20, 2014 00:14 IST

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा व एकूणच गुन्हेगारी, दहशतवादी घटना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्याच्या गृहखात्याचे अद्याप धोरणच ठरले नसल्याने पोलीस यंत्रणेकडून सिंहस्थ कुंभमेळा निधीतून मागण्यात येणारे सुमारे सहा कोटी रुपये कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा व एकूणच गुन्हेगारी, दहशतवादी घटना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्याच्या गृहखात्याचे अद्याप धोरणच ठरले नसल्याने पोलीस यंत्रणेकडून सिंहस्थ कुंभमेळा निधीतून मागण्यात येणारे सुमारे सहा कोटी रुपये कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महानगरांतील गुन्हेगारी घटना व संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विषय अनेक वेळा चर्चिला गेला. विधिमंडळाच्या अधिवेशनातही यासंदर्भातील चर्चा होऊन गृहखात्याला त्याबाबतचे धोरण ठरविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सहा महिन्यांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर तर पुण्यात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा मुद्दा ऐरणीवर येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महिन्याच्या आत कॅमेरे बसविण्याची घोषणा केली. नाशिक शहरात महत्त्वाचे चौक व ठिकाणांवर कॅमेरे बसविण्याबाबत आमदार वसंत गिते यांनी आमदार निधी खर्च करण्याची तयारी दर्शविली होती; परंतु या कॅमेर्‍यांची देखभाल, दुरुस्ती तसेच नियंत्रण कोण व कसे करणार याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले असता, त्यावेळी यासंदर्भात शासन धोरण ठरवित असल्याचे उत्तर देण्यात आले होते. तेव्हापासून हा विषय थंड बासनात बांधण्यात आला. आता मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी जवळपास चार कोटी रुपयांचे, तर ग्रामीण पोलिसांनी अडीच कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे प्रस्तावित केले आहेत. शहरातील प्रमुख मार्ग, चौक, महत्त्वाची ठिकाणे, साधुग्राम, रामकुंड व शाही मिरवणूक मार्गावर हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या कॅमेर्‍यांचे नियंत्रण व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पोलीस यंत्रणा घेणार असली, तरी राज्य सरकारचे व पर्यायाने गृहखात्याचे याबाबतचे धोरणच निश्चित झाले नसल्याने सिंहस्थ निधीतून पैसे कसे उपलब्ध करून द्यायचे असा पेच निर्माण झाला आहे. कारण सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च शासनाच्या तिजोरीतून उचलला जाणार असल्याचे यापूर्वीच शासनाने जाहीर केले असल्याने, जर शासनच सीसीटीव्हीसाठी वेगळा निधी देणार असेल तर सिंहस्थ कामांमधून हा निधी का द्यावा, असा दुसरा प्रश्नही यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. त्यातही पुन्हा बसविले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी की तात्पुरते याचा उलगडा अद्यापही पोलीस यंत्रणा करू शकलेली नाही, त्यामुळेही याला खो बसला आहे.