शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खतप्रकल्पावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: September 13, 2016 01:23 IST

महासभेवर प्रस्ताव : गैरप्रकारांना बसणार आळा

नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने उभारलेल्या खतप्रकल्पावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंबंधीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासंबंधी १० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कचऱ्यामध्ये दगड-विटा नेण्यास रोखण्यापासून ते प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत मोठा उपयोग होणार आहे.महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत खतप्रकल्पावर प्रतिदिन सरासरी ४०० टन कचरा नेला जात असतो. ठेकेदारांना कचऱ्याच्या वजनावर रक्कम अदा केली जात असते. परंतु, काही घंटागाड्यांमध्ये कचऱ्याचे वजन जास्त दिसावे यासाठी दगड-विटांचा वापर केला जात असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. वजन वाढविण्याच्या या गैरप्रकाराला रोख लावण्यासंबंधीही महासभांमध्ये वारंवार चर्चा होत आलेली आहे. याशिवाय, खतप्रकल्पावर दोन महिन्यांपूर्वी कचरा वेचणाऱ्या मायलेकींचा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. त्यावेळी खतप्रकल्पाच्या सुरक्षितेतचाही विषय चर्चिला गेला. सदर कचरावेचक महिला नेमक्या कुठून गेल्या याबाबत ऊहापोह होऊन खतप्रकल्पावर सुरक्षा रक्षक नेमण्याचाही मुद्दा समोर आला होता. दरम्यान, घंटागाडीच्या नवीन ठेक्याला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, लवकरच प्रशासनामार्फत संबंधितांना कार्यादेश काढले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खतप्रकल्पावर प्रशासनाची नजर राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे १० लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)