शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

७७६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:17 IST

स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.

नाशिक : स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. शहरात स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार, त्याबाबत सर्व्हे करण्यात आला असता, पोलीस आयुक्तालयाकडून ३४३ ठिकाणी ११०६ सीसीटीव्ही कॅमेरे, तर नाशिक महापालिकेने ४३३ ठिकाणी १८४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित केले आहे. शहरात एकूण ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रकल्पाच्या एकूण खर्चासह आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर तो भागधारक-हितधारकांपुढे सादर केला जाणार आहे.  दरम्यान, स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत शहरात आॅप्टिकल फायबर केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, त्याच्या लांबीबाबत महाआयटीचे तज्ज्ञ पथक काम करत आहे. याशिवाय, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरचीही निर्मिती केली जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटरही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नियोजित आहे. या साºया प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. महापालिका व पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संयुक्तरीत्या सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.