शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बारावी : नेहरूनगरचे ९८ टक्के, देवळाली कॅम्पचे ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालयांनी राखली १०० टक्के निकालाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:18 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देनाशिकच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळवले लक्षणीय निकालाची परंपरा अखंडित राखली

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळवले आहे. नाशिकमधील केंद्रीय विद्यालयांसह सिम्बॉययिस स्कूल, केंब्रिज स्कूलसारख्या सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपली लक्षणीय निकालाची परंपरा अखंडित राखली आहे.सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ८३.१ टक्के निकाल लागला आहे. नाशिक शहरातील सिम्बॉयसिस स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, सिम्बॉयिससमधून अनुजा टिपरे हिने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. या परीक्षसाठी सिम्बॉयसिसचे ३१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९१ ते ९५ टक्के मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत. ८१ ते ९० टक्के गुण मिळवणारे सहा विद्यार्थी, तर ७१ते ८० टक्के गुण मिळवणारे १७ विद्यार्थी आहेत. या परीक्षेत तर अनुजा टिपरे हिने ९५.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळवला आहे, तर मुकूल आचवल याने ९३.८ टक्के व सलोनी खन्ना हिने ९३.४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील केंब्रिज स्कूलमध्ये सोहम गायकवाड यानेही ९५.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकावला, तर श्रृती पवार हिने ९५.४ व प्रेक्षा फडके हिने ९४ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.केंब्रिज स्कूलनेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून, शाळेच्या परीक्षेला बसलेल्या सर्व ६८ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यश संपादन केले आहे. वडनेर गेटच्या आर्टिलरी सेंटर येथील केंद्रीय विद्यालयाचाही बारावीचा आर्टस, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के निकाल लागला असून, सायन्सचे ३०, आर्टसचे ११ व कॉमर्सचे २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्सचा चिराग बेहराने ९१.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून, निशांतसिंगने ८९.६० टक्के व शिवानी बोरसे हिने ८७ टक्के गुण मिळवत प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाचे यश मिळवले आहे. आर्टस शाखेत पूजा डागर हिने ८९.२२ टक्के, सोनाली गायकरने ८८.६० टक्के, तर मुस्कान गलिवालने ८५.८० टक्के गुण मिळवले आहेत. कॉमर्स शाखेत नेहा सिंगने ८३.६० टक्के प्रियंका महालेने ८०.४० टक्के गुण मिळवले आहेत.