शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतही खबरदारी

By admin | Updated: May 16, 2017 00:38 IST

नाशिक : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेमधून चोरलेल्या ‘सायबर शस्त्रा’च्या आधारे हॅकर्सनी केलेल्या सायबर हल्ल्याचा धसका महापालिकेनेही घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेमधून चोरलेल्या ‘सायबर शस्त्रा’च्या आधारे हॅकर्सनी केलेल्या सायबर हल्ल्याचा धसका महापालिकेनेही घेतला असून, ई-मेलमधील कोणत्या अ‍ॅटॅचमेंटमध्ये व्हायरस पसरू शकतो याची माहिती सर्व खातेप्रमुखांना देण्यात आली आहे व त्याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व विभागांना संगणक विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी फार मोठ्या प्रमाणात संगणकीय कार्यप्रणालीवर रॅन्समवेअर या संवर्गातील व्हायरसचा हल्ला झाला आहे. या व्हायरसमुळे जवळपास ७४ देशांमधील संगणकीय कार्यप्रणालीवर परिणाम झालेला आहे. प्रामुख्याने विन्डोजचे जुने व्हर्जन असलेल्या संगणकांवर या व्हायरसचा हल्ला झाला आहे. ज्या सिस्टिम्सवर हा व्हायरसचा हल्ला झाला त्या सिस्टीम्स पूर्णपणे लॉक होऊन सर्व डाटा हा व्हायरस एन्करप्ट करतो. हा व्हायरस इंटरनेटद्वारे व प्रामुख्याने ई- मेलद्वारे पसरत आहे. ई-मेलमधील अ३३ंूँेील्ल३ ३ं२‘२ूँी.ी७ी या नावांची फाईल असल्यास ती ओपन केल्यास हा व्हायरस पसरतो आणि जेवढे संगणक नेटवर्कमध्ये कनेक्ट आहेत अशा सर्व संगणकावर या व्हायरसचा प्रभाव पडतो. आतापर्यंत या व्हायरसला समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे खबरदारी बाळगणे व प्रतिबंधात्मक उपाय करणे हाच पर्याय आहे. सदर व्हायरसवर प्रतिबंधक उपाय म्हणून मनपाने मायक्रोसॉफ्टने प्रसिद्ध केलेले पॅचेस सर्व संगणकांवर अपडेट केले आहेत. तसेच मनपाच्या फायरवॉल सिस्टममध्येदेखील सदर पॅचेस अपडेट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ई-मेलमधील कोणत्या अ‍ॅटॅचमेंटमध्ये व्हायरस पसरू शकतो याची माहिती सर्व खातेप्रमुखांना देण्यात आली आहे व त्याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व विभागांना संगणक विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती संगणक विभागप्रमुख प्रशांत मगर यांनी दिली आहे.