नाशिक : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून दोघांनी एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास शिवाजीनगरमध्ये घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरच्या चौधरी चाळमध्ये राहणारा प्रीतम श्याम कोर (१७) हा रात्री ११ वाजेच्या सुमारास घराजवळ उभा होता़ त्यावेळी संशयित राधेश्याम मिठाईलाल भारती (२५) व सुरेश मिठाईलाल भारती (रा. शिवाजीनगर, सातपूर) या दोघांनी तंबाखू मागितली. मात्र कोर यांनी तंबाखू न दिल्याचा राग येऊन या दोघांनी बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने पाठीवर वार केला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
तंबाखूच्या कारणावरून एकावर वार
By admin | Updated: October 24, 2015 22:08 IST