शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:49 IST

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी (दि.९) मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्गजवळ जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुमारे चार टन मांसासह १ लाख ९० हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देभाटवाडी शिवार : सुमारे चार टन मांस जप्त

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी (दि.९) मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्गजवळ जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुमारे चार टन मांसासह १ लाख ९० हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर बाजूकडून अवैध मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती (क्र. एमएच ०८ पी ६४९९) घोटी मार्गावर हॉटेल निसर्गजवळ बजरंग दल व गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी अडविला. त्यात बर्फाच्या मोठ्या लाद्यांमध्ये मांसाचे तुकडे असल्याचे आढळून आले.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस गस्ती पथकातील हवालदार जाधव, पोलीस शिपाई अमोल गुंजाळ यांनी घटनास्थळी येत सदर वाहनाचा ताबा घेतला. पोलिसांनी संशयित नासीर हुसेन गुलाम हुसेन मलिक (२०) व अरबाज अब्दुल हमीद कुरेशी (१९) दोघे, राहणार कुर्ला, मुंबई यांना ताब्यात घेतले.विनापरवाना वाहतूक जप्त केलेला टेम्पो पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यातील मांसाचे वजन केले असता ते ३७९० किलोग्रॅम इतके भरले. या मांस वाहतुकीबाबत कोणताही परवाना वरील दोघांकडे नव्हता. पोलिसांनी रात्री उशिरा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. बुधवारी (दि.१०) या दोघांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंगाराम सारूक्ते तपास करीत आहेत.