शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर कावडधारकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:29 IST

वणी/कळवण : सप्तशृंगी व जगदंबा देवीचा जय घोष करीत कावडधारकांनी मंगळवारी वणीत प्रवेश केला. रात्री उशिरा गडावर पदयात्रा करीत कावडधारक मार्गस्थ होण्याकारिता सज्ज झाले आहेत.

वणी/कळवण : सप्तशृंगी व जगदंबा देवीचा जय घोष करीत कावडधारकांनी मंगळवारी वणीत प्रवेश केला. रात्री उशिरा गडावर पदयात्रा करीत कावडधारक मार्गस्थ होण्याकारिता सज्ज झाले आहेत.कोजागरी पौर्णिमेला कावडीतून आणलेल्या तीर्थद्वारे सप्तशृंगगडावर देवीला अभिषेक घालण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्या परंपरेस अनुसरून प्रतिवर्षी हजारोंच्या संख्येने विविध राज्यांतील कावडधारक मजल दरमजल करून शेकडो किलोमीटरची पदयात्रा करत तांब्याच्या गडव्यांमध्ये विविध नद्यांचे तीर्थ घेऊन सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होतात. या प्रवासादरम्यान स्वयंसेवी संस्था व सामाजिक उपक्रम राबविणाºया घटकाकडून फराळ-पाण्याची व्यवस्थाही नियोजित असेत. पायात घुंगरू, भगवे वस्र, सुशोभित कावडी व मुखात भगवतीचा जयघोष असा हजारोंच्या संख्येतील कावडधारकांचा लवाजमा भक्तिभावाने कावड यात्रेत सहभागी होऊन निर्भेळ आनंद प्राप्त करतात. मात्र यावेळी प्रतिवर्षीच्या तुलनेत कावडधारकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते, अशी माहिती टॅक्सीचालक संघटनेचे नाना जाधव व विजय बर्डे यांनी दिली. कारण कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वदिनी नाशिक -वणी रस्त्याचे अंतर प्रवासी वाहनाने कापताना किमान दोन तास कावडधारकांच्या गर्दीमुळे लागत असते. त्या तुलनेत यावर्षी कावडधारकांची संख्या या मार्गावर कमी असल्याचे दिसून आली, अशी माहिती त्यांनी दिली. मनमाड, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, असलोद परिसरातील कावडधारकांनी जगदंबा देवी मंदिरात हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजता कावडधारकांच्या गडव्यातील तीर्थाने भगवतीला अभिषेक करण्यात येणार आहे. जगदंबा मातेचे दर्शन घेऊन प्रस्थानकोजागरी पौर्णिमेला गडावर जाण्यापूर्वी वणीच्या जगदंबेचे दर्शन घेण्याकरिता कावडधारक येतात. मागील वर्षी शहरातील सर्व भागात ठिकठिकाणी कावडधारकांचे जत्थे दिसून येत होते; मात्र सध्या ही संख्या कमी झाल्याचे जाणवत असल्याची माहिती व्यावसायिक मंगेश दायमा यांनी दिली. शेतमालाला भाव नाही, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, त्याचा परिणाम व्यावसायावर झाल्याची माहिती व्यावसायिक सदाशिव चव्हाणके यांनी दिली.