नाशिकरोड : सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सोमवारी सायंकाळी क्राईम ब्रॅँच युनिट ३ च्या पथकाने एका युवकाकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. क्राईम ब्रॅँच युनिट ३चे पोलीस नाईक विलास गांगुर्डे यांना सिन्नरफाटा येथील मार्केट यार्डसमोर एक युवक गावठी कट्टा विकण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक संजय सानप, सुभाष गुंजाळ, बाळासाहेब दोंदे, रवि बागुल, दीपक जठार, संजय मुळक, परमेश्वर दराडे, गंगाधर केदार, जाकीर शेख, आत्माराम रेवगडे, संतोष कोरडे आदिंनी मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयीत समाधान दगडू कोळी (२० रा. अरिंगळे मळा, एकलहरारोड) हा संशयास्पदरीत्या जात असताना सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे गावठीकट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
युवकाकडून गावठी कट्टा जप्त
By admin | Updated: November 16, 2015 23:24 IST