शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे गोवंश संगोपन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

महाराष्ट्रातील शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा बैलगाडी शर्यत हा मराठी संस्कृतीचा पारंपरिक मर्दानी खेळ. महाराष्ट्रातील असंख्य गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये ...

महाराष्ट्रातील शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा बैलगाडी शर्यत हा मराठी संस्कृतीचा पारंपरिक मर्दानी खेळ. महाराष्ट्रातील असंख्य गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये या शर्यतींचे आयोजन केले जाते. धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची जपवणूक या खेळाद्वारे केली जाऊन या पारंपरिक खेळातून देशी गायी-बैलांचे संगोपनही केले जाते. या पारंपरिक खेळाच्या अस्तित्वामुळेच देशी गोवंशांची वाढ होते. याच खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कारागीर, सामान्य शेतकऱ्यांना वाहतूक व्यवस्थेसह चांगल्या स्वरूपात आर्थिक पाठबळ मिळते. परंतु, आज या खेळास बंदी आल्यामुळे गोवंशांची वाढही धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची व महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांचे संरक्षण करणे, जतन करणे हा सर्वसामान्य नागरिकांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी तालुक्याचे मुरलीधर सोनवणे, संजय वारुळे, सौरभ गायकवाड, रवी बोरणारे, नीलेश कातुरे, रामदास इंगळे, राजू शिंदे, राजू गुरू, धनराज पालवे, दत्ता जाधव, गणेश बोळीज, विष्णू पवार, संतोष लभडे, गोरख चव्हाण, कचरू गाढे, जालिंदर गायकवाड, डेंगळे, सागर जांभळे, अजय महाले, किरण पवार, लक्ष्मण आहेर आदींसह तालुक्यातील विविध गावांतील बैलगाडी शर्यतप्रेमी शेतकरी उपस्थित होते.

इन्फो

खिलार गोवंश धोक्यात

संपूर्ण जगाला पशुधनामध्ये महाराष्ट्राची ओळख निर्माण करून देणारा व महाराष्ट्राचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला ‘खिलार’ हा देशी गोवंश असून, आयुर्वेद शास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. बैलगाडी शर्यत बंदीमुळे अशा खिलार देशी गाय-बैल यांच्या वंशाचे संगोपन धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत सुरु करावी, खिलार गोवंश वाचविणे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या निवेदनात केल्या आहेत.

फोटो : १८ बुलक निवेदन

बैलगाडी शर्यत चालू करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना माणिकराव शिंदे, संभाजी पवार, समवेत उपस्थित शेतकरी.

180821\18nsk_37_18082021_13.jpg

फोटो : १८ बुलक निवेदन बैलगाडी शर्यत चालू करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना माणिकराव शिंदे ,संभाजी पवार समवेत उपस्थित शेतकरी.