शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकावर खानपान सेवाधारकांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:51 IST

मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे.

ठळक मुद्देमनमाड : रेल्वे अधिकारी मनमानी करत असल्याची तक्रार

मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे.रेल्वेस्थानकावरील कॅन्टीनवर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे गॅस सिलिंडर गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्या ऐवजी विद्युत शेगडी वापरण्याची तोंडी सूचना देण्यात आली असली तरी वीज मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील स्टॉलवर कुकिंग बंद असल्याने प्रवाशांना ताजे खाद्यपदार्थ देण्यास अडचण निर्माण झाली आहे. स्थानकावरील वेटर-वेंडरचे मेडिकल करण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही रेल्वेचे अधिकारी मंजुरी देत नाही.स्टॉलवर फक्त रेल निल पाण्याची बाटली विकण्यास सक्ती केली जात आहे मात्र या पाण्याच्या बाटल्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचे अधिकारी मनमानी करून त्रास देत आहेत. या कारभाराला कंटाळून आम्ही बेमुदत कॅन्टीग बंद आंदोलन सुरू केले असल्याचे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे कैटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शर्मा यांनी सांगितले.रेल्वेचे अधिकारी व स्टॉलधारक यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा फटका प्रवाशांना बसत असून त्यांना ताजे खाद्यपदार्थ मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत.