शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:00 IST

नाशिक : रेशनमधून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्याऐवजी त्या धान्य खरेदीचे पैसे थेट बॅँक खात्यावर जमा करण्याच्या योजनेस राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईच्या आझाद मैदान व महालक्ष्मी या दोन ठिकाणच्या रेशन दुकानांमध्ये त्याची सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकाधारक खुल्या बाजारातून चांगल्या प्रतीचे धान्य खरेदी करू शकतो,

नाशिक : रेशनमधून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्याऐवजी त्या धान्य खरेदीचे पैसे थेट बॅँक खात्यावर जमा करण्याच्या योजनेस राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईच्या आझाद मैदान व महालक्ष्मी या दोन ठिकाणच्या रेशन दुकानांमध्ये त्याची सुरुवात करण्यात आली आहे.सध्या सरकार शेतकºयांकडून धान्य आधारभूत किमतीत खरेदी करून ते धान्य शिधपत्रिकाधारकांना स्वस्त दरात रेशनमधून उपलब्ध करून देत आहे. यात शासनाचे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडत असून, गोरगरीब तसेच पात्र लाभार्थींना त्याचा लाभ मिळत आहे. रेशनमध्ये चालणारा काळाबाजार आटोक्यात आणण्यासाठी पॉस यंत्राचा वापर केला जात असला तरी, बहुतांशी ठिकाणी शिधापत्रिकाधारकांच्या अज्ञानाचा फायदा घेत रेशन दुकानदारांकडून त्यांना पुरेसे धान्य दिले जात नसल्याचेही आढळून आले आहे.सध्या राज्यात दोन रेशन दुकानांतून याची सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी येणाºया अनुभवातून त्याची पुढील अंमलबजावणी केली जाणार आहे; मात्र या योजनेस आत्तापासूनच रेशन दुकानदारांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. सव्वापट रक्कम थेट बॅँक खात्यात जमा करणारतांत्रिकदृष्ट्या अशा सर्वांचा शोध घेणे अशक्य असल्यामुळे त्यापेक्षा थेट शिधापत्रिकाधारकाला दर महिन्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या तुलनेत पैसेच देणे अधिक योग्य असल्याचे शासनाचे म्हणणे आहे व त्यामुळेच थेट घरपोहोच योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने जाहीर केलेल्या धान्याच्या आधारभूत किमतीच्या सव्वापट रक्कम शासन शिधापत्रिकाधारकाच्या थेट बॅँक खात्यात जमा करणार आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकाची संमती आवश्यक असून, त्याला हवे असेल तर तो रेशनमधून धान्य खरेदी करू शकतो. शासनाकडून दिल्या जाणाºया धान्य रकमेच्या पैशातून शिधापत्रिकाधारक खुल्या बाजारातून चांगल्या प्रतीचे धान्य खरेदी करू शकतो, असेही शासनाचे मत आहे.