शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरण्याच्या बहाण्याने रोकड लंपास

By admin | Updated: August 2, 2016 01:51 IST

पंचवटीतील प्रकार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पंचवटी : मशीनमध्ये पैसे कसे भरायचे माहिती नसल्याचे सांगत पैसे खात्यात जमा करण्यासाठी मदत मागण्याचा बहाणा करून बँकेत आलेल्या ग्राहकांचे पैसे हातोहात लांबवणाऱ्या कल्याण येथील टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून, यातील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही व चारचाकी वाहनाच्या वर्णनावरून पोलिसांनी कल्याण येथून प्रतापसिंग शंकरसिंग राजपूत, परवेज अकबर अली, हसमत अली बरकत अली शेख, महेंदी अकबर अली शेख, अर्जुन वाल्मीक पाटील (सर्व राहणार मारळगाव, कल्याण) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी चार जण उत्तर प्रदेशातील आहेत, तर पाटील जळगाव जिल्ह्यातील पाचोरे येथील रहिवासी आहे. गेल्या आठवड्यात बोरगड येथील सूर्यकांत माळी पैसे भरण्यासाठी दिंडोरी रोडवरील स्टेट बँकेत आले असताना दोघा संशयितांनी आम्हाला अर्जंट गावाला पैसे पाठवायचे असल्याचे सांगत हातातील नोटांसारखा दिसणारा बंडल माळी यांच्याकडे देत त्यांच्या हातातील २८ हजार रुपयांची रोकड घेतली. माळी यांनी सहकार्य म्हणून बंडल घेत त्यातील नोटा मोजण्याच्या अगोदरच संशयितांनी पळ काढला. पैसे भरण्यासाठी दिलेल्या बंडलमध्ये कागद असल्याने फसगत झाल्याचे लक्षात येताच माळी यांनी म्हसरूळ पोलिसांत तक्र ार दाखल केली होती. यापूर्वी पंचवटी परिसरातही बँकेत पैसे भरणा करण्याचा बहाणा करून रोकड चोरल्याची घटना घडली होती. संशयितांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. (वार्ताहर)