शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खून प्रकरणी पतीसह साथीदारास जन्मठेप

By admin | Updated: October 5, 2016 01:13 IST

पत्नीच्या खून प्रकरणी पतीसह साथीदारास जन्मठेप

लासलगाव : पत्नी शीतल भारत घोटेकर हिचा साथीदाराच्या मदतीने अमानुषपणे खून करून चार दरोडेखोरांनी लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावर सात मोरी भागात मोटारसायकल अडवून पत्नीवर बलात्कार केल्याचा बनाव करणारा पती भारत धोक्र ट व त्याचा साथीदार गुलाब निवृत्ती ठाकर यांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. मंत्री यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील रावळगाव जळगाव येथून बाळंत झालेल्या मेहुणीची भेट घेऊन पत्नी शीतल भारत धोक्रट (२७) हिचेसह सिन्नर तालुक्यातील कोळगाव येथे मोटारसायकल क्र मांक एमएचव्ही ५५८७ ने घरी जात असताना चार दरोडेखोरांनी मोटारसायकल अडवून मारहाण करून खिशातून मोबाइल काढून घेतला त्याचबरोबर शस्त्राचा धाक दाखवून पत्नीवर बलात्कार करून तिचा खून केला, अशी फिर्याद विवाहितेचा पती भारत गणपत धोक्र ट याने लासलगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र म देशमाने , पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे यांच्यासह तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर घटनास्थळी पोहोचले; परंतु हा पूर्णपणे बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पत्नी शीतल हिच्याशी पटत नसल्याने पती भारत याने त्याचा साथीदार गुलाब निवृत्ती ठाकर याच्या मदतीने तिचा अमानुष खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. मंत्री यांच्यासमोर खटला सुरू होता. या खटल्याच्या कामकाजात जिल्हा सहायक सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. एन. हाडपे यांनी दहा महत्त्वाचे साक्षीदार तपासले. या खटल्याचा निकाल मंगळवारी लागून पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने पती भारत धोक्र ट व त्याचा साथीदार गुलाब ठाकर या दोघांना जन्मठेप व दोन हजार रु पये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.