शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडप्रकरणी पांजरापोळ संस्थेवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:13 IST

पेठरोडवरील अंबिकानगर पाठीमागे असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या सर्व्हे क्रमांक ७७ मध्ये संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी तब्बल २८ वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी नाशिक पांजरापोळ संस्थेच्या व्यवस्थापकासह सुपरवायझरविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर पाठीमागे असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या सर्व्हे क्रमांक ७७ मध्ये संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी तब्बल २८ वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी नाशिक पांजरापोळ संस्थेच्या व्यवस्थापकासह सुपरवायझरविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा पंचवटी उद्यान विभागाचे प्रभारी निरीक्षक राहुल खांदवे यांनी या बेकायदा वृक्षतोडीबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.२९) पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या पांजरापोळच्या जागेतील मोठ्या वृक्षांची पोकलॅन मशीनच्या साहाय्याने कत्तल सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी फोन करून उद्यान विभागाला कळविली होती. त्या माहितीच्या आधारे पंचवटी उद्यान विभागाचे खांदवे व पथक घटनास्थळी गेले असता तेथे सुबाभूळ, बॉटल ब्रश, विलायती चिंच, काशिद, कडुनिंब, रानभेंडी, गावठी बोर आदींसह जवळपास २५ ते ३० मोठ्या वृक्षांची पोकलॅन मशीनच्या सहाय्याने कत्तल केल्याचे निदर्शनास आले होते. मनपा उद्यान विभागाच्या पथकाला बघून वृक्षतोड करणाºयांनी तेथे पोकलॅन मशीन व अन्य साधन साहित्य सोडून पळ काढला होता. उद्यान विभागाच्या वतीने वृक्षतोड केलेल्या वृक्षांचा पंचनामा करण्यात येऊन माहिती मनपा अधिकाºयांना कळविली होती. दरम्यान, याबाबत बुधवारी सकाळी खांदवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेत झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मनपा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी पांजरापोळ व्यवस्थापक तसेच सुपरवायझर बाळू शिरसाठ यांच्यावर झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोडलेला लाकूडफाटा पळविण्याचा प्रयत्नकाल मंगळवारी पांजरापोळच्या जागेतील बेकायदा वृक्षतोड प्रकरण उघडकीस आले होते. मनपा पथकाने घटनास्थळी धाव घेताच वृक्षतोड करणाºयांनी पलायन केले होते. बुधवारी (दि.३०) सकाळी मनपा पथक पुन्हा पांजरापोळच्या जागेत गेले असता मंगळवारी वृक्षतोड केलेली लाकडे एका ट्रॅक्टरमध्ये भरून पळविण्याचे काम सुरू होते. पथकाला बघताच पुन्हा ट्रॅक्टर व पोकलॅन मशीन सोडून कामगारांनी पलायन केले. दरम्यान, वृक्षतोड करण्यासाठी वापरलेल्या पोकलॅन मशीनला क्र मांक नसल्याने पोकलॅन वाहन संशयास्पद आहे. दुपारी पोलीस पोकलॅन वाहन आणण्यासाठी पांजरापोळच्या जागेत गेले होते.