शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 28, 2014 01:14 IST

संशयितांमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते व नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशींचा समावेश

संशयितांमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते व नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशींचा समावेशनाशिक : डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या मुलाचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी एका आमदारासह तीन नगरसेवकांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अपहरणातील संशयितांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक रवि पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, डी़ जी़ सूर्यवंशी यांच्यासह आणखीन सात-आठ जणांचा समावेश आहे़डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक अर्चना राजेंद्र कोठावदे (३८, रा़ डोंबिवली) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार त्यांचा मुलगा प्रतीक राजेंद्र कोठावदे याचे २६ एप्रिल २०१४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाथर्डी फ ाटा येथून आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक रवि पाटील, नाशिकचे शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, शिवसेनेचे नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशी यांच्यासह सात-आठ जणांनी सफे द रंगाच्या मर्सिडिजमधून अपहरण केले़प्रतीकचे अपहरण केल्यानंतर त्यास संशयितांनी कल्याण येथील हॉटेल हेरिटेज येथील रूम नंबर २०८ मध्ये एक दिवस डांबून ठेवून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात नेऊन नगरसेविका अर्चना कोठावदे यांचे अपहरण झाल्याची फि र्याद देण्यास भाग पाडले़ अपहृत प्रतीकची परीक्षा तसेच बाहेरगावी गेल्यामुळे फि र्यादीस विलंब झाल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे़स्थायी निवडणुकीदरम्यानची घटनासुमारे एक महिन्यापूर्वी डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवक अर्चना कोठावदे गायब झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती़ कोठावदे यांची गायब होण्याची वृत्तेही प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या संख्येने प्रकाशित झाली होती़ दरम्यान, घटनेच्या तब्बल एक महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे राजकीय वाद असल्याची चर्चा आहे़बोरस्ते, सूर्यवंशींबाबत चर्चेला उधाणगेल्या काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून महानगरप्रमुख अजय बोरस्ते व शिवसेना नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशी यांची पोलीस उपआयुक्तांनी नोटिसा देऊन चौकशी केली होती़ या चौकशीला काही दिवस होत नाही तोच या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे़