शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी जमविल्याप्रकरणी मालेगावी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

गालीबनगरात मारहाण; एक जखमी मालेगाव : शहरातील रविवार वॉर्ड गालीबनगर भागात जिन्याचे काम करू दिले नाही या कारणावरून धारदार ...

गालीबनगरात मारहाण; एक जखमी

मालेगाव : शहरातील रविवार वॉर्ड गालीबनगर भागात जिन्याचे काम करू दिले नाही या कारणावरून धारदार चाकूने वार करून एकास जखमी करण्यात आले. याप्रकरणी जाकीर अन्वर रफीक अहमद (२७, रा. गालीबनगर) यांनी किल्ला पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी जफर आबीद शरीफ अहमद, नोमान सईद अहमद, शरीफ अहमद (रा. गालीबनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

संगमेश्वरच्या सावता नगरातून दुचाकी चोरी

मालेगाव : शहरातील संगमेश्वर भागातील सावतानगरमधील सातारकर अपार्टमेंटजवळ उभी केलेली २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स दुचाकी (एमएच ४१- डब्ल्यू ०८५०) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. नीळकंठ निंबा मांडगे (रा. सावतानगर) यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. गेल्या गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

गळफास घेऊन एकाची सोनज येथे आत्महत्या

मालेगाव : तालुक्यातील सोनज येेथे किशोर अभिमन सोनवणे (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा चुलतभाऊ रवींद्र सोनवणे याने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास जमादार खैरनार करीत आहेत.

झोडगे शिवारात बेवारस मृतदेह

मालेगाव : तालुक्यातील झोडगे शिवारात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह अर्जुन संजय देवरे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली मिळून आला. तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक बच्छाव करीत आहेत.