शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॉश स्पेअरपार्ट प्रकरणी नगरसेवकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:04 IST

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात ...

ठळक मुद्देबनावट स्पेअरपार्ट प्रकरण : आणखी संशयित ताब्यातप्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास पोलीस कोठडी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते़बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका घेतलेला प्रमुख संशयित छोटू चौधरी याने कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून त्यातील डिफेक्टिव्ह पार्ट रिपेअर करण्यासाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये तीनमजली इमारतीत कारखानाच सुरू केला होता़ बॉश कंपनीचे हे स्पेअरपार्ट तो विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक करीत होता़ ३१ डिसेंबर २०१७ ला स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर याची चर्चा होऊन ती पोलीस व राजकीय पुढाºयांपर्यंत पोहोचली़ यानंतर अंबडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन पोलीस कर्मचारी व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून यामध्ये स्वत:चे हात ओले करून घेतल्याची चर्चा आहे़बॉश कंपनीतील हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होऊन आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले़ मात्र, एकमेकांवरील राजकीय राग काढण्यासाठी आलेली ही आयतीच संधी दवडण्यासाठी कोणीही तयार नसल्याने हे प्रकरण पोलिसांत गेले़ विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला प्रकरण उजेडात येऊनही पोलिसांनी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल केला व ११ कोटी रुपयांचे बॉश कंपनीचे स्पेअरपार्ट जप्त केल्याची माहिती दिली़ या प्रकरणात पोलिसांनी प्रथम दोन कामगारांना अटक केली व नातेवाइकांचीही चौकशी बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात संशयाच्या भोवºयात असलेल्या पोलिसांकडून नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाइकांची चौकशी सुरू असून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जात आहेत़ मुळात नगरसेवकांसह संशयित पोलिसांची वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडून चौकशी होणे गरजेचे असताना या चौकशीतून काय निष्पन्न होणार याबाबत शंकाच आहे़ दरम्यान, या प्रकरणात सातपूरमधील एका नगरसेवकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, त्याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे़