शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहक प्रशिक्षणाला; बसफेऱ्या उशिराने

By admin | Updated: July 10, 2016 00:59 IST

प्रवाशांची गैरसोय : बढतीसाठी प्रशिक्षण

पंचवटी : एसटी खात्यात वाहक म्हणून काम करणाऱ्या वाहकांना कंट्रोलर म्हणून बढती मिळावी, यासाठी गुरुवारपासून विभाग नियंत्रकात सलग तीन दिवस सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी बस आगारातील वाहक गेल्याने त्याचा परिणाम शहरातील बसफेऱ्यांवर झाला असल्याची ओरड प्रवाशांनी केली आहे. वाहक प्रशिक्षणाला गेले असले तरी शहरातील बसफेऱ्या नियमाने चालू आहेत; मात्र नियमित वेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनिटे बस उशिराने ठरलेल्या मार्गावर पोहोचत असल्याची कबुली एसटी खात्याकडून देण्यात आली. पंचवटी आगारातून संपूर्ण शहरात प्रवाशांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी दैनंदिन बसेस ठरलेल्या मार्गावर जातात. गुरुवारपासून विभाग नियंत्रकात वाहकांना बढती मिळावी यासाठी तीन तासांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असल्याने बस आगारातील ठरलेल्या कर्मचारी यादीनुसार विभाग नियंत्रकात प्रशिक्षणाला जात असल्याने ठरलेल्या मार्गावर बसेस धावत आहेत; मात्र त्या नियोजित वेळेत जाण्याऐवजी पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने त्याचा फटका प्रवासी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशिक्षण सुरू राहणार असल्याने तोपर्यंत बसेस नियमित वेळेपेक्षा थोड्याफार फरकाने उशिराने ठरलेल्या मार्गावर पोहोचतील तसेच या प्रशिक्षणामुळे कोणत्याही प्रकारे बससेवा बंद करण्यात आलेली नाही, असेही एसटीच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)