शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरण जलवाहिनीच्या पाणी गळतीकडे काणाडोळा

By admin | Updated: September 8, 2015 22:48 IST

अपव्यय : मालेगावी दुष्काळात तेरावा महिना

मालेगाव : येथील महानगरपालिकेने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे येथील गिरणा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीकडे काणाडोळा केला आहे. ही गळती थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात धरणात पाणी साठा नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चणकापूर व गिरणा धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन मनपाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. असे असताना येथील गिरणा धरण पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच जलवाहिनी सडली आहे. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढत असून, सध्या सुमारे दोन ते तीन इंच पाणी बाहेर फेकले जात आहे. याविषयी अनेकांना तक्रारी केल्या नंतरही मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने या दुरुस्तीकडे काणाडोळा केला असल्याचे वाया जाणाऱ्या पाण्यावरून दिसून येते. या भागात अहोरात्र सुरू असलेल्या पाणी गळतीने रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून, ते परिसरात साचत आहे. त्यामुळे तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही पाणी गळती थांबविण्याऐवजी मनपाने सरळ दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. या पाणी गळतीला दीड ते दोन वर्ष झाले आहेत. या काळात किती पाणी वाया गेले? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)