शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुस्टर डोस साठी काळजी घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:31 IST

नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील घेण्याचे आावाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देटास्क फोर्स : लसीकरणाबाबत यादी तयार करणार

नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील घेण्याचे आावाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसचा आढावा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हर्लन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापुरकर, आदी उपस्थित होते.गेल्या १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील अजूनही ज्या अधिकारी कर्मचारी यांनी लस घेतली नाही, त्यांनादेखील लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरण मोहिमेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले. पुढच्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या संदर्भातील नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. नोडल अधिकाऱ्यांनी पूर्वतयारीबाबतची प्राथमिक माहिती सादर केली.दरम्यान, झालेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या सुधारणा करणे अपेक्षित आहे त्याबाबतची सुधारणा पुढील टप्प्यात करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही मांढरे यांनी सांगितले.आजपर्यंत साधारण ४१ हजार ८०७ लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय