शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

हृदयरोगाचा झटका आता तिशीच्या तरुणांनाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:26 IST

जंक फूड, फास्ट फूडला पसंती देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे आणि मद्यप्राशन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचा ‘शौक’ पुरविण्याच्या नादात तरुणाई हृदयरोगाची बळी ठरू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाची तिशी गाठलेल्या तरुणांना हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदविले.

नाशिक : जंक फूड, फास्ट फूडला पसंती देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे आणि मद्यप्राशन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचा ‘शौक’ पुरविण्याच्या नादात तरुणाई हृदयरोगाची बळी ठरू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाची तिशी गाठलेल्या तरुणांना हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदविले.हृदयरोगाविषयी असलेली जागरूकता वयाची पन्नाशी पार केलेल्या गटामध्ये वाढत आहे; मात्र तिशीतला तरुण याबाबत अद्यापही अनभिज्ञ असल्यासारखा वावरत आहे. त्यामुळे त्याच्या हृदयाची कार्यक्षमताही धोक्यात येऊ लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्पर्धेच्या युगातील ताणतणाव आणि व्यसनाधिनतेच्या आहारी जाणारी तरुणाई यामुळे तारुण्यात हृदयरोगाला निमंत्रण मिळत आहे. आहार, व्यायामाविषयी ज्येष्ठांमध्ये जागरूक ता असून, सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाºयांमध्ये त्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र जॉगिंग ट्रॅकवर दिसते.तरुणाई जीममध्ये जाऊन जरी घाम गाळत असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जीममध्ये जाणाºया तरुणांमध्येही आहाराविषयी जागरूक राहणारे तरुण फार कमी आढळून येतात, असे हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामुळे हृदयरोग आता तारुण्यात ‘धक्का’ देऊ लागला आहे....तर वेळीच व्हावे सावध !तुम्ही जर दररोज ट्रॅकवर पाच फेºया न थकता व श्वासोच्छवासामध्ये कुठलाही अडथळा न जाणवता पूर्ण करत असाल आणि एखाद्या दिवशी तीन फेºयांमध्येच जर थकवा जाणवला आणि छाती भरल्यासारखी झाली व श्वास जड होऊन घाम फुटला किंवा दोन मजल्यापर्यंत पायºया चढून सहज जात असताना एखाद्या दिवशी धाप लागली आणि वरीलप्रमाणे स्थिती झाली तर सावध होऊन हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.अल्कोहोल वाढवितो ‘एलडीएल’अल्कोहोलचे प्रमाण शरीरात अधिक गेल्यास रक्तामध्ये ‘कोलेस्ट्रॉल एलडीएल’ वाढून रक्तवाहिन्यांमध्ये त्याचे थर साचू लागतात. एखाद्या जलवाहिनी किंवा मलवाहिनीमध्ये जसा गाळ साचतो त्याप्रमाणे रक्तवाहिन्यांची अवस्था होऊन हृदयाला झटका येतो, असे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अल्कोहोल हे हृदयासाठी हानिकारक ठरणारे आहे.