शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

करपामुळे कोबीचे पिकही धोक्यात

By admin | Updated: September 8, 2015 22:39 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : महागडी किटकनाशकेही प्रभावी ठरेनात

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात मिरचीचे पिक रोगांमुळे वाया जात असल्याने शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो या पिकांतून सरासरी उत्पादन घेणे सुरू केले होते. मात्र यंदाच्या वातावरणाचा फटका या पिकांनाही बसला आहे. पहिल्या, दुसऱ्या दोन्ही टप्यातील कोबीचे पिक करपा ,खोड अळी अशा विविध रोगांना बळी पडल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र महागडी औषधे फवारणी करून शेतकरी ते पिक वाचविण्याची धडपड करत आहेत. पिळकोस परिसरात मिरचीचे पीक खरीप हंगामातील प्रमुख पिक म्हणून पाहिले जायचे. मात्र मिर्चीचे पीकही रोगांना बळी पडू लागल्यामुळे मिर्चीच्या तुलनेत खर्चिक असलेल्या कोबी,टोमॅटो या पिकातून शेतकऱ्यांनी चांगले उतपन्न घेतले होते. परंतु दोन वर्षापासून कोबीच्या पिकातून खर्चही निघत नाही. एकतर बियाण्यात फसवणूक होत आहे अन्यथा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे. एकीकडे पावसाअभावी पिके करपून चालली असून अशातही ज्यांनी शेती केली आहे, ते शेतकरी हे कोबी वाचवण्याची धडपड करत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या टप्यातील लागवड केलेले कोबीचे पिक रिंग करप्याने उद्वस्त झाले आहे. त्यामुळे पिकांवर महागडी कीटकनाशके फवारली जात आहेत.

 

 

वटारमध्ये पिके धोक्यातवटार : बागलाण तालुक्यातील पश्‍चिम पट्टयातील वटार,डोंगरे, विंचुरे,कंधाने परिसरात सुरूवातीला रिमझिम पाऊस आणि विहीरांच्या थोड्याफार पाण्यावर जगवलेली खरीप पिके पावसाने चांगलीच ओढ दिल्याने आता मात्र वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिळकोस:पावसाअभावी शेतमजूरांनाही कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काही शेतकर्‍यांनी कोबी आणि टमाटा पिकाची लागवड केली होती. मात्र पिकावर करपा,पाकोळी अशा रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकर्‍यांचे अधिकच नुकसान झाले आहे.मका,बाजरी ही पिके अत्यंत केविलवाण्या स्थितीत आहेत. पिकांची वाढ खुंटली असून पुढील चार-पाच दिवसात पुरेसा पाऊस न झाल्यास ती पिके वाया जातील. गेल्या आठ दिवसात तर तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी मका, बाजरी ही खरीप पिके सोडली आहे. कोबी पिकाला प्रचंड खर्च झालेला आहे मात्र हे पिकही रोगाला बळी पडत आहे. यंदा कोबी पिकावर फवारणी करूनही फवारणीचा उपयोग होत नाही आहे. उलट फवारणीसाठी केलेला खर्च व्यर्थ ठरतो आहे. यंदा पाऊसच न पडल्याने विहिरी कोरड्या आहेत. पैसा मिळणारे ह्या हंगामातील शेवटचे पिक होते मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने तेही निम्याहून अधिक खराब झाले असून खर्चही वसूल होईल की नाही अशी परिस्थिती आहे.   - रवींद्र वाघ, शेतकरी, .