इगतपुरी : गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच ४१ आर ७७७८) मुंबई-आग्रा महामार्गावर तळेगाव शिवारातील एका हॉटेलसमोर रविवारी (दि. ६) पहाटे ५ वाजेच्या सुमारात पोलिसांनी जप्त केली असून, चालकास ताब्यात घेतले आहे.या गाडीच्या डिक्कीत व सीटखाली सुमारे ४०० किलो वजनाचे गोवंश मांस घेऊन जात असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना कळवले होते. महामार्ग पास होताच ही गाडी हॉटेलजवळ थांबली होती. दरम्यान, या गाडीच्या शोधात असलेल्या पोलिसांना शहरातील स्थानिकांनी खबर देताच ते घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गाडीसह चालकाला ताब्यात घेतले.इगतपुरीतील भाजपाचे युवा नेते महेश श्रीश्रीमाळ व सामाजिक नेते महेश शिरोळे आणि काही युवकांनी ही बाब उघड केली. संबंधित घटना इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, ट्रॅफिक पोलीस के. के. जाधव यांनी घटनास्थळावर जाऊन गाडीसह मुद्देमाल जप्त केला व वाहनचालक नवसाद अहमद शेख (२३) राहणार मोगलपुरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गोरक्षनाथ बबन शेलार यांनी घोटी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी नवसाद अहमद शेख याला न्यायालयात हजर करणार असून न्यायालयाच्या आदेशाने गोवंश मांस नष्ट केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेत सुमारे दोन लाख रुपये रोख व चाळीस हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पोलीस हवालदार के. के. जाधव व पथक करीत आहेत.
गोमांस घेऊन जाणारी गाडी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:34 IST
इगतपुरी : गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच ४१ आर ७७७८) मुंबई-आग्रा महामार्गावर तळेगाव शिवारातील एका हॉटेलसमोर रविवारी (दि. ६) पहाटे ५ वाजेच्या सुमारात पोलिसांनी जप्त केली असून, चालकास ताब्यात घेतले आहे.
गोमांस घेऊन जाणारी गाडी जप्त
ठळक मुद्देपोलिसांनी गाडीसह चालकाला ताब्यात घेतले.गाडीच्या डिक्कीत व सीटखाली सुमारे ४०० किलो वजनाचे गोवंश मांस