शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाथरे शिवरातून पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली कार हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:49 IST

सिन्नर : शिर्डी-शिनशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडे तत्त्ववर कार ठरवणार्या चोरट्यांनी गेल्या मिहन्यात पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ठळक मुद्देटोळीचा म्होरक्या राजगुरूनगर येथील जेल तोडून पाळलेला अट्टल गुन्हेगार

सिन्नर : शिर्डी-शिनशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडे तत्त्ववर कार ठरवणार्या चोरट्यांनी गेल्या मिहन्यात पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे.सदर कारच्या मदतीने गुन्हा करून पळणार्या तिघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या राजगुरूनगर येथील जेल तोडून पाळलेला अट्टल गुन्हेगार असलयाचे समजते.गेल्या महिन्यात दि. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता नाशिकच्या द्वारका तेथून तिघा तरु णांनी शिंगणापूरला जाण्यासाठी ओला या कंपनीची कार आॅनलाईन बुक केली होती. मात्र त्यांना पिकअप करण्यासाठी द्वारका परिसरात तात्काळ कार उपलब्ध न झाल्याने ओला कंपनीने अन्य कार सिर्वसेस मार्फत एमएच १५ ई ई ०९०२ या क्र मांकाची मारु ती स्विफ्ट डिझायर कार सदर प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पाठवण्यात आली होती. एजाज अफजल पटेल (२८) रा. कॅनॉल रोड, जेलरोड (नाशिकरोड) हा चालक कारमध्ये या तिघा प्रवाशांना घेऊन शिनशिंगणापूरकडे निघाला असताना पाथरे गावाच्या लगत असणार्या सायाळे रस्त्यावर या तिघांनी कार नेण्यास सांगितले. चालकाने विरोध केल्यावर एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल सदृश्य हत्यार लावले. महामार्गापासून अर्धा किमी आत गेल्यावर चालक एजाज यांच्या जवळील मोबाईल फोन, खिशातील कागदपत्रे व १७०० रु पये रक्कम काढून घेऊन त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नालीत ढकलून देण्यात आले. तेथून कार पुन्हा महामार्गाकडे नेत हे तिघे प्रवासी पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कारचा चालक एजाज याच्या तक्र ारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर कार व तिघा संशयितांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार चोरीचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात दाखल आहे.गेल्या शनिवारी (दि.१२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राजगुरूनगर परिसरात स्विफ्ट डिझायर कार आडवी लावून एका बोलेरो जीपमधील प्रवाशांना लुटण्यात आले होते. एमएच १४ डीएक्स ८७८५ या क्र मांकाच्या कारमधून आलेल्या पाच जणांनी बोलेरो जीपमधील प्रवाशांना उतरून देत ती लांबवली होती. ही घटना घडल्यावर चाकण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन्ही वाहने पकडण्यात आली. पोलिसांनी रस्ता अडवल्याचे पाहून पाचही चोरटे खाली उतरून पळू लागले. त्यातील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विशाल दत्तात्रय तांदळे (२२) , गणेश भास्कर वाबळे (१८), आरिफ अस्लम नाईकवाडे (२१) सर्व रा. मंचर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.