शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कपाटकोंडी कायम, बाल्कनीची अडचण

By admin | Updated: February 9, 2017 00:50 IST

बांधकाम नियमावली सोशल मीडियावर : गावठाणातील चटई क्षेत्रात घट

नाशिक : शहरासाठी बहुचर्चित बांधकाम नियंत्रण व विकसन नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात शहरातील बहुचर्चित वादग्रस्त कपाटाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या नियमावलीनुसार ९ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असेल अशा ठिकाणी टीडीआर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे गावठाण भागात रस्ता रुंदीच्या निकषावरच चटई क्षेत्र वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे गावठाणमध्ये सध्या दुप्पट मिळत असलेले चटई क्षेत्र रस्त्याच्या निकषावर कमी करण्यात आले आहे. सुमारे वर्षभरापासून रखडलेला विकास आराखडा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत मंजूर झाला असला तरी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मात्र मंजूर होत नव्हती. आता ही नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विनास्वाक्षरी असलेली ही नियमावली मंजूर करण्यात आल्याचे काही विकासकांनी स्पष्ट केले आहे. अर्थात,आयुक्तांनी त्यास दुजोरा दिलेला नाही. आपल्याकडे मंजुरीची प्रत आली नसल्याचे त्यांनी सांगितले.व्हायरल झालेल्या या २०६ पानांच्या नियमावलीत नाशिककरांचा कपाटाचा प्रश्न सुटलेला नाही. संपूर्ण नियमावलीत दोन ठिकाणी कबर्ड या शब्दाचा वापर झालेला आहे, परंतु त्यात नाशिकच्या बहुचर्चित समस्याची तड लागली नसल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. उलट बाल्कनीसाठी १५ टक्के परवानगी आहे. मात्र, त्यासाठी तीन मीटर मार्जिनल स्पेस असणे आवश्यक आहे. बाल्कनी बंद करून घेण्यास यापूर्वी असलेली तरतूद रद्द करण्यात आली असून त्यामुळे कपाट कोंडी कायम असून बाल्कनीची नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.